हिंदवी स्वराज्य स्तंभ डिझाईन स्पर्धेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदवी स्वराज्य स्तंभ डिझाईन स्पर्धेचे आयोजन
हिंदवी स्वराज्य स्तंभ डिझाईन स्पर्धेचे आयोजन

हिंदवी स्वराज्य स्तंभ डिझाईन स्पर्धेचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः हिंदवी स्वराज्य शपथभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भेर येथील श्री क्षेत्र रायरेश्‍वर येथे हिंदवी स्वराज्य स्तंभ उभारण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने हिंदवी स्वराज्य स्तंभ डिझाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असल्याची माहिती बायोस्फिअर्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सचिन पुणेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी रायरेश्र्वर ग्रामस्थ संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रेय जंगम, सचिव रवींद्र जंगम, बीएनसीएच्या प्रा. अस्मिता जोशी, नेहा गायकवाड, अभिजित भसाळे आदी उपस्थित होते. ही स्पर्धा बायोस्फिअर्स, बीएनसीए महाविद्यालय, रायरेश्र्वर ग्रामस्थ संस्था आणि ग्रामपंचायत रायरी यांच्या वतीने ठेवण्यात आली आहे. यावेळी डॉ. पुणेकर म्हणाले, ‘‘स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या डिझाईन मधील निवडक डिझाईन्सला पारितोषिके दिली जाणार आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या डिझाईनच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्य स्तंभ साकारला जाईल. यासाठी हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी मोलाची भूमिका बजावणाऱ्या १२ भिन्न मावळ प्रांत आणि भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात असलेल्या विविध युद्ध व क्रांतीक्षेत्रांचे स्मरणचित्र किंवा उल्लेख आदी गोष्टींचा समावेश या स्तंभाच्या उभारणीत केला जाईल. यामुळे स्वराज्य निर्मितीसाठी केलेल्या देदीप्यमान त्यागाचा इतिहासाबाबत माहिती मिळेल.’’ स्पर्धेअंतर्गत स्तंभ डिझाईनचा आकार, डिझाईन फाइल, थ्रीडी ग्राफिक्स, संकल्पना विकसित पद्धती, तांत्रिक गोष्टी आदींसाठी अटी असून १० फेब्रुवारी पर्यंत स्पर्धकांना आपल्या डिझाईन्स swarajyastambha@gmail.com यावर पाठवाव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले.