महावितरणच्या अभियंत्यावर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरणच्या अभियंत्यावर गुन्हा दाखल
महावितरणच्या अभियंत्यावर गुन्हा दाखल

महावितरणच्या अभियंत्यावर गुन्हा दाखल

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : विजेचा धक्का लागून नववीत शिकणाऱ्या एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावरील ओमकार सोसायटीमध्ये नुकतीच घडली. याप्रकरणी महावितरणच्या कात्रज विभागातील अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना येथे २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता घडली होती. या घटनेत ऋषिकेश मंजुनाथ पुजारी (वय १४) या मुलाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मंजुनाथ पुजारी (वय ५७, रा. बराटे चाळ, कर्वेनगर) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून शिवलिंग बोरे या अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार सोसायटीमधील गार्डनमध्ये महावितरणच्या विजेच्या खांबावरील वीजवाहिनी जमिनीपासून चार फुटावर लोंबकळत होती. याबाबत नागरिकांनी तक्रार करूनही महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दखल घेतली नाही. दरम्यान, कर्वेनगर येथील मंजुनाथ पुजारी हे कामानिमित्त कात्रजला आले होते. त्यांचा मुलगा ऋषिकेश हा त्यांच्यासोबत आला होता. तो खेळताना गार्डनमध्ये गेलेला बॉल आणण्यासाठी गेला. त्यावेळी विजेचा धक्का बसून तो गंभीर भाजला. उपचारादरम्यान त्याचा ३० ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर हलगर्जीपणा केल्यामुळे ऋषिकेशचा मृत्यू झाल्याच्या कारणावरून अभियंत्यावर गुन्हा दाखल केला आहे.