ग्राहकांच्या प्रतिक्रीया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्राहकांच्या प्रतिक्रीया
ग्राहकांच्या प्रतिक्रीया

ग्राहकांच्या प्रतिक्रीया

sakal_logo
By

वाहनांचे अनेक पर्याय एक्स्पोच्या निमित्ताने एकाच ठिकाणी पाहायला मिळाले. एकाच छताखाली अनेक कंपन्या असल्याने गाडी खरेदीचा निर्णय घेणे सोपे झाले आहे. सध्या र्इव्हीची मागणी वाढत आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे आहेत.
-वसंत केदारी, नोकरदार


गाडी घ्यायचे म्हटले की अनेक शोरूमला भेट द्यावी लागते, मात्र या एक्स्पोमुळे मला सर्वत्र जावे लागले नाही. त्यामुळे गाडी खरेदीचा निर्णय सोपा झाला. एक्स्पोचे आयोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यात आले आहे. त्यामुळे चांगला अनुभव आला.
-कैलास बिरामणे, व्यावसायिक

नवीन दुचाकी र्इव्ही घेण्याच्या विचारात असलेल्यांसाठी हा एक्स्पो महत्त्वाचा ठरणार आहे. कारण र्इव्हीचे अनेक पर्याय आहे आहेत. र्इव्हीसह पेट्रोल, डिझेलच्या अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहन कंपन्यांत एक्स्पोत आहेत.
-तुषार वखारकर, नोकरदार

मी इलेक्ट्रिक दुचाकी घेण्यासाठी या एक्स्पोत आले होते. इथे मला अनेक पर्याय एकाच ठिकाणी पाहायला मिळाल्याने दुचाकींची तुलना करता आली. त्यामुळे मी कोणते वाहन घ्यावे याचा निर्णय घेणे सोपे झाले आहे. त्यानुसार मी दुचाकी बुक देखील केली.
-नेहा साळुंखे, नोकरदार