मोफत श्रवण तपासणी शिबिराचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोफत श्रवण तपासणी शिबिराचे आयोजन
मोफत श्रवण तपासणी शिबिराचे आयोजन

मोफत श्रवण तपासणी शिबिराचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : नववर्षानिमित्त सातारा रस्त्यावरील पंचमी हॉटेल चौकाजवळ आंबुलकर स्पीच ॲण्ड हिअरिंग क्लिनिक पहिला मजला, ललवानी इस्टेट येथे १ ते ३१ जानेवारीदरम्यान सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत मोफत श्रवण तपासणी, सल्ला व मार्गदर्शन तसेच मोफत श्रवण यंत्रांची चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व अत्याधुनिक, डिजिटल, अदृश्य तसेच रिचार्जेबल श्रवण यंत्रांची माहिती येथे दिली जाणार आहे. श्रवण यंत्रामधील नवीन तंत्रज्ञानाबाबतही माहिती देण्यात येईल. या शिबिरात दर रविवारी सकाळी ११ ते १ या वेळेत विविध कंपन्यांच्या तज्ज्ञांना क्लिनिकमध्ये बोलावून त्यांच्या श्रवण यंत्राबाबत सखोल माहिती मिळणार आहे. याव्यतिरिक्त सर्व प्रकारच्या श्रवण यंत्रांवर आकर्षक सवलत दिली जाणार आहे. या शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन आंबुलकर स्पीच ॲण्ड हिअरिंग क्लिनिकतर्फे संस्थापक अविचल आंबुलकर यांनी केले आहे.