
‘राष्ट्रीय स्टार्टअप डे’ निमित्त व्याख्यानांचे आयोजन
पुणे, ता. १४ : ‘राष्ट्रीय स्टार्टअप डे’च्या निमित्ताने फाउंडेशन फॉर मेक इट हॅपन सेंटर फॉर इन्व्हेंशन इनोव्हेशन ॲण्ड इनक्युबेशनच्यावतीने (एफएमसीआयआयआय) स्टार्टअप प्रदर्शनासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचे व्याख्यान आणि यशस्वी स्टार्टअपच्या संस्थापकांचे मनोगत आयोजित केले आहे.
मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कर्वेनगरमधील कॅम्पसमध्ये सोमवारी (ता. १६) सकाळी नऊ ते एक दरम्यान हे सत्र पार पडेल. त्यास प्रमुख पाहुणे म्हणून सुहास बक्षी, शैलेंद्र गोस्वामी, केदार गोखले, अनुप कुलकर्णी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विविध इंडस्ट्रिअल, बँकिंग, इन्व्हेस्टमेंट आणि स्टार्टअप क्षेत्रातील तज्ज्ञ या वेळी उपस्थित राहतील. एफएमसीआयआयआय सेंटर मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, टाटा टेक्नॉलॉजिस लिमिटेड आणि सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने स्टार्टअपना मार्गदर्शन, लॅब सपोर्ट, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, इन्व्हेस्टमेंट व ऑफिस स्पेससाठी मदत करते.