पानिपत वीरांना मानवंदना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पानिपत वीरांना मानवंदना
पानिपत वीरांना मानवंदना

पानिपत वीरांना मानवंदना

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : इतिहास प्रेमी मंडळ आणि सेव्ह हेरिटेज यांच्यातर्फे पानिपत रणसंग्रामाच्या २६२ व्या वर्षानिमित्त पानिपत वीरांना मानवंदना देण्यात आली. नदी पात्रातील श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या समाधीस्थळ परिसरात हा कार्यक्रम झाला. यावेळी पेशव्यांचे वंशज पुष्कर पेशवे, तुषार दामगुडे, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे आदी मान्यवर उपस्थित होते. यानिमित्त शेकडो पणत्यांनी पेशव्यांच्या समाधीचा परिसर उजळून निघाला.

यावेळी शेटे म्हणाले, ‘‘मराठा साम्राज्याचे सर्वात जास्त काळ म्हणजेच तब्बल २१ वर्षे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी काम केले. याच काळात पानिपतचे युद्ध झाले. तंजावर ते पेशावर एकाच ध्वजाखाली असावे, हे शिवरायांचे स्वप्न पेशव्यांच्या काळात मराठ्यांनी पूर्ण केले. मराठ्यांनी फक्त महाराष्ट्राचे नाही, तर भारताचे रक्षण केले आहे. त्यासाठीच मराठे पानिपत युद्धाकरिता उत्तरेत गेले होते. पानिपतच्या युद्धानंतर खैबरखिंडीतून हिंदुस्थानात येण्याची कोणाची हिंमत झाली नाही, हे मराठ्यांच्या कडव्या झुंजीचे यश आहे. आपला इतिहास हा पराक्रमाचा व तेजस्वी आहे. देशाचा विचार पहिल्यांदा करणे, हा संदेश पानिपतच्या युद्धात मराठ्यांनी दिला आहे.’’