श्री एम लिखित ‘शून्य’ पुस्तकाचे आज प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री एम लिखित ‘शून्य’ पुस्तकाचे आज प्रकाशन
श्री एम लिखित ‘शून्य’ पुस्तकाचे आज प्रकाशन

श्री एम लिखित ‘शून्य’ पुस्तकाचे आज प्रकाशन

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : मानवी जीवनात परिवर्तनशील विचारांची रुजवात करणारे ‘शून्य’ हे इंग्रजीतील बहुचर्चित पुस्तक आहे. शून्याच्या विश्‍वातील संचार अन्‌ जीवनाचे अंतरंग उलडणारी अभ्यासपूर्ण रचना या पुस्तकातून मांडण्यात आली असून, ‘सकाळ प्रकाशन’तर्फे श्री एम लिखित ‘शून्य’ या मराठीतील पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी (ता. १६) सायंकाळी साडेपाच वाजता शिवाजीनगरमधील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात होत आहे.

प्रकाशन समारंभाला सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक व ‘ए पी ग्लोबाले’चे अध्यक्ष अभिजित पवार, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. मुकुल सुतावणे हे या वेळी उपस्थित राहणार आहेत. ‘द सत्संग फाउंडेशन’चे संस्थापक श्री एम यांचे ‘शून्य’ या संकल्पनेवरील चिंतन असून, समाजातील प्रचलित कुप्रथांवर ते भाष्य करते. केरळमधील एका छोट्या, शांत उपनगरात तो अचानक कुठूनतरी अवतरला. तो स्वतःला ‘शून्य’ म्हणवतो, झिरो. परंतु तो नक्की आहे तरी कोण? एका नवीन कालखंडाची मुहूर्तमेढ रचून एक नवा साहसी मार्ग निर्माण करून ‘शून्य’ एकाएकी नाहीसा होतो, असे या पुस्तकाचे कथानक आहे.

काय? : श्री एम लिखित ‘शून्य’चे प्रकाशन
केव्हा? : सोमवार (ता. १६), सायंकाळी साडेपाच वाजता
कोठे? : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, शिवाजीनगर