Sat, Jan 28, 2023

सूर सरिता संगीत महोत्सव मंगळवारी
सूर सरिता संगीत महोत्सव मंगळवारी
Published on : 15 January 2023, 4:18 am
पुणे, ता. १५ ः ज्येष्ठ सितारवादक सरिता मित्रगोत्री यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी आयोजित करण्यात येणारा ‘सूर सरिता संगीत महोत्सव’ यंदा मंगळवारी (ता. १७) पार पडणार आहे. संपदा भालेराव व डॉ. समीर मित्रगोत्री परिवार यांच्यातर्फे आयोजित हा महोत्सव सायंकाळी ५ वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात होणार आहे. या महोत्सवात पं. जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य आणि ज्येष्ठ गायक पं. हेमंत पेंडसे यांचे गायन, संपदा भालेराव यांचे सतारवादन आणि पं. पेंडसे यांच्या शिष्या व युवा गायिका राधिका ताम्हनकर यांचे गायन होणार आहे.