बेकायदा शाळांवर कारवाईची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेकायदा शाळांवर कारवाईची मागणी
बेकायदा शाळांवर कारवाईची मागणी

बेकायदा शाळांवर कारवाईची मागणी

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : राज्यातील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळांनी बनावट कागदपत्रांद्वारे बेकायदा शैक्षणिक वर्ग चालविले आहेत. या शाळांनी हजारो विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक केली आहे. या शाळांवर आणि त्याला जबाबदार असणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करावी, तसेच शाळांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पुणे शहर युवा सेनेचे शहरप्रमुख सनी गवते यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यात ५६० प्राथमिक, तर ११४ माध्यमिक शाळांना बेकायदा परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे. या शिक्षण संस्थांची नावे, पत्ता, अर्ज करणाऱ्यांची नावे आणि कोणाच्या अधिकारात बेकायदा परवानगी मिळाली, याची माहिती द्यावी, अशी मागणीही गवते यांनी केली. या शाळांवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.