स्वाती देशिंगकर लिखित ‘सीतायन’ पुस्तकाचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वाती देशिंगकर लिखित ‘सीतायन’ पुस्तकाचे प्रकाशन
स्वाती देशिंगकर लिखित ‘सीतायन’ पुस्तकाचे प्रकाशन

स्वाती देशिंगकर लिखित ‘सीतायन’ पुस्तकाचे प्रकाशन

sakal_logo
By

स्वाती देशिंगकर लिखित
‘सीतायन’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे ः स्वाती देशिंगकर लिखित ‘सीतायन’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखिका-कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते नुकतेच झाले. याप्रसंगी रवींद्र खरे, प्रल्हाद अवचट उपस्थित होते. ‘एक स्त्री म्हणून सीतेचा प्रवास लेखिकेने समरसून अनुभवला आहे’, असे मत डॉ. ढेरे यांनी व्यक्त केले. खरे यांनी रामायणाचा अभ्यास वेगवेगळ्या दृष्टीकोनातून व्हायला हवा, असे सूचित करत लेखिकेने चितारलेल्या सीतेच्या व्यक्तिरेखेविषयी समाधान व्यक्त केले. ‘सीतेचे रामाआधी नाव येणे, हेच सीतेचे महत्त्व आहे’, असे अवचट यांनी सांगितले. लेखिका देशिंगकर यांनीही मनोगत व्यक्त केले. अमृता भागवत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

योगीराज संगीत महोत्सवाचे आयोजन
पुणे ः सद्‍गुरु गुळवणी महाराज यांच्या ४९ व्या पुण्यतिथीनिमित्त योगीराज संगीत महोत्सवाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या पहिल्या सत्रात शिरीष उपाध्ये यांच्या अभंग व करुणापदीला रसिकांनी भरभरून दाद दिली. त्यानंतर पं. अतुलकुमार उपाध्ये यांचे व्हायोलिन वादन झाले. त्यांनी राग नंदकंस राग सादर केला. भजन व भैरवीने त्यांनी वादनाचा समारोप केला. दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात गायिका किशोरी जानोरिकर यांनी राग यमन व भजन सादर करत रसिकांची दाद मिळविली. दुसऱ्या सत्रामध्ये पं. राजेंद्र कुलकर्णी यांचे बासरी वादन झाले. त्यांनी राग रागेश्वरी सादर केला. या कार्यक्रमास आश्रमाचे प्रमुख विश्वस्त शरदराव जोशी व देवीदास जोशी उपस्थित होते.