‘मुलांच्या विकासासाठी त्यांना वेळ देणे गरजेचे’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मुलांच्या विकासासाठी त्यांना वेळ देणे गरजेचे’
‘मुलांच्या विकासासाठी त्यांना वेळ देणे गरजेचे’

‘मुलांच्या विकासासाठी त्यांना वेळ देणे गरजेचे’

sakal_logo
By

पुणे, ता. १८ ः ‘‘मुलांना आपण किती सकारात्मक आणि गुणवत्तापूर्ण वेळ देतो, याचा विचार करायला हवा. जसे संस्कार करतो, तशीच मुले घडतात. प्रत्येक मुलामध्ये गुण असतातच, आपण त्यांना ज्या मार्गावर नेऊ, त्या मार्गावर ते जातात. त्यांच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करायला हवे’’, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. माधवी वैद्य यांनी बुधवारी व्यक्त केले.
संजीवनी बोकील लिखित ‘आनंदाची फुले’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या. याप्रसंगी साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका व कवयित्री डॉ. संगीता बर्वे, राजहंस प्रकाशनाचे डॉ. सदानंद बोरसे, लेखिका संजीवनी बोकील आदी उपस्थित होते. ‘कुमार साहित्याकडे अधिक गांभीर्याने बघण्याची गरज आहे’, असे मत डॉ. बर्वे यांनी व्यक्त केले. ‘राजहंस प्रकाशनाने बाल साहित्याच्या क्षेत्रात नुकतेच पदार्पण केले असून, सकस बाल साहित्याची निर्मिती करण्याचा आमचा प्रयत्न असेल’, असे डॉ. बोरसे यांनी सांगितले. ‘संवेदना हरवत चालेल्या अन् अधिकाधिक व्यवहारी होत जाणाऱ्या आजच्या जगात मुलांच्या हाती संवेदनाक्षम साहित्य पडले पाहिजे’, असे बोकील यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी केले आयोजन
सूत्रसंचालनापासून ते आभार प्रदर्शनापर्यंत सगळी जबाबदारी पार पाडणारे विद्यार्थी, हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, मा. स. गोळवलकर प्रशाला, रमणबाग प्रशाला, अहिल्यादेवी हायस्कूल आणि सेवासदन (इंग्रजी माध्यम) या शाळांमधील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.