शासकीय ग्रंथगारातर्फे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय ग्रंथगारातर्फे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन
शासकीय ग्रंथगारातर्फे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

शासकीय ग्रंथगारातर्फे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त शासकीय फोटोझिंको मुद्रणालय आणि ग्रंथगाराच्यावतीने शुक्रवारपासून (ता.२०) पाच दिवशीय ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे ग्रंथ प्रदर्शन रविवारचा अपवाद वगळता २५ जानेवारीपर्यंत शासकीय ग्रंथगार येथे चालणार आहे. या प्रदर्शनात ऐतिहासिक, सांस्कृतिक ठेवा असलेले महत्त्वाचे ग्रंथ, महापुरुषांची चरित्रे, लेखनसाहित्य, सरकारची अधिकृत प्रकाशने ही १० टक्के सवलतीच्या दरात खरेदी करता येणार आहेत. शासकीय फोटोझिंको मुद्रणालयाच्यावतीने अनेक दुर्मिळ ग्रंथ आणि पुस्तके प्रकाशित करण्यात येतात. शिवाय बाजारात न मिळणारी अनेक दुर्मिळ पुस्तके येथे उपलब्ध असतात. त्यामुळे या प्रदर्शनाच्या निमित्ताने नागरिकांना सवलतीत ग्रंथ खरेदी करता येणार आहेत. नागरिकांनी या ग्रंथप्रदर्शनास भेट द्यावी आणि ग्रंथ खरेदी करावी, असे आवाहन या मुद्रणालयाचे व्यवस्थापक स. ह. केदार यांनी केले आहे.