
ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘जीवनसाथी’ मेळावा
पुणे, ता. २० : अहमदाबाद येथील अनुबंध फाउंडेशन आणि के विस्ता ग्रुप लायन्स क्लब ऑफ श्री क्षेत्र देहूगाव यांच्यातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी विनाशुल्क ‘जीवनसाथी परिचय’ मेळावा आयोजित करण्यात आला आहे. रविवारी (ता.२२) जानेवारीला सकाळी ९ वाजता निगडी येथील परमार कॉम्प्लेक्समधील गार्डन रेस्टॉरंट येथे होईल. मेळाव्यात सहभागी होण्यासाठीची वयोमर्यादा ५० ते ८० वर्षे आहे. इच्छुक व्यक्तींनी आपला एक फोटो, आधार कार्डची सत्यप्रत, तसेच भूतपूर्व जीवनसाथीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाच्या कागदपत्रांची सत्यप्रत सोबत आणावी. दुरून येणाऱ्या गरीब महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना येण्या-जाण्याच्या रेल्वेचा खर्च दिला जाईल. तसेच त्यांच्या राहण्याची सोयही केली जाणार आहे. अनुबंध फाउंडेशनने यापूर्वी ७१ मेळावे घेतले आहेत. त्यातून आत्तापर्यंत १९१ जोड्या जुळल्या आहेत. एकाकी ज्येष्ठ नागरिकांचे जीवन आनंदी आणि अर्थपूर्ण करणे, हा या मेळाव्याचा उद्देश आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : नटूभाई पटेल-(अहमदाबाद) ९८२५१८५८७६ आणि सरिता आवाड -(पुणे) ९८३३९८७५६८.