लांजेकर, धामणे यांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजेकर, धामणे यांचा गौरव
लांजेकर, धामणे यांचा गौरव

लांजेकर, धामणे यांचा गौरव

sakal_logo
By

पुणे, ता. १९ ः भारत सर्वांत तरुण देश आहे. हे आपण अभिमानाने सांगतो. पण पुढील ३५ वर्षांनी वृद्ध होणारा देश भारत असेल. पुण्यात अनेक वृद्धाश्रम झाले आहेत, ही त्याचीच सुरुवात आहे. समाज असा का होतो आहे? यामध्ये पुरुषार्थ काय? हा विचार आपण करायला हवा, असे मत एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी व्यक्त केले.
अंजनीबाई विठ्ठलराव मोहिते प्रतिष्ठानतर्फे आयोजित माऊली व प्रेरणा पुरस्कार प्रदान सोहळ्यादरम्यान ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, ॲड. सुभाष मोहिते, दिलीप मोहिते, शिरीष मोहिते आदी उपस्थित होते. यंदाचा माऊली पुरस्कार दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांच्या मातोश्री सुनीता लांजेकर यांना आणि प्रेरणा पुरस्कार नगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठानचे डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचेता धामणे यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद भारदे यांनी केले. तर, विक्रांत मोहिते यांनी आभार मानले.