
टीटीके प्रेस्टिजची ग्राहकांसाठी खास ऑफर
पुणे, ता. १९ ः विवाहासाठी गिफ्ट्स खरेदी करण्याचा काळ पुन्हा आला आहे. त्यासाठी टीटीके प्रेस्टिजने स्पेशल ‘सुपर सेव्हर ऑफर २०२३’ नुकतीच लाँच केली आहे.
या ऑफरतंर्गत प्रेस्टिजच्या उत्पादनांच्या मुबलक श्रेणीवर ग्राहकांना आनंददायी सूट व बचत देण्यासोबतच ‘बाय वन, गेट ॲट लिस्ट १ फ्री’ ही ऑफरही मिळणार आहे. त्यातून ग्राहक त्यांच्या आवडीच्या वस्तू खरेदी करू शकतात आणि प्रेस्टिजसह उत्तम सूट व मोफत गिफ्ट्सचा अधिकाधिक लाभ घेऊ शकतात.
टीटीके प्रेस्टिज लिमिटेडच्या विक्री व विपणनाचे उपाध्यक्ष दिनेश गर्ग म्हणाले, ‘‘दरवर्षी आमचे ग्राहक सुपर सेव्हर
ऑफरसाठी उत्सुक असतात. तेथे त्यांना उत्पादनांच्या मुबलक प्रकारांतून हव्या असलेल्या वस्तू निवडता येतात. कुकिंग सुलभ व जलद करणारी नवी उत्पादने देण्यासाठी आम्ही ग्राहकांसाठी कटिबद्ध आहोत. किफायतशीर दरांमध्ये येणाऱ्या आमच्या उच्च दर्जाच्या अप्लायन्सेस व कूकवेअरसह आम्ही प्रत्येक भारतीय कुटुंबासाठी कुकिंग अधिक कार्यक्षम बनवण्यावर लक्ष केंद्रित करतो.’’
टीटीके प्रेस्टिजच्या सुपर सेव्हर ऑफरमध्ये सर्व उत्पादन श्रेणींमध्ये आकर्षक डील्स आहेत. प्रेस्टिज किचन अप्लायन्सेस बरोबर ड्युओ/निओ ३ बर्नर गॅस स्टोव्हची खरेदी करता येते. गॅस स्टोव्हसोबत ऑफरमध्ये मोफत आकर्षक वस्तूही ग्राहकांना मिळतील.