कंपनीविरोधात खोटा दावा दाखल करणाऱ्या कर्मचाऱ्याला दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंपनीविरोधात खोटा दावा 
दाखल करणाऱ्या कर्मचाऱ्याला दंड
कंपनीविरोधात खोटा दावा दाखल करणाऱ्या कर्मचाऱ्याला दंड

कंपनीविरोधात खोटा दावा दाखल करणाऱ्या कर्मचाऱ्याला दंड

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : कंपनी सोडल्यानंतर दोन वर्षांचा बोनस, सहा महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता दिला नाही. तसेच तीन महिन्यांची सी.टी.सी. रक्कमही दिली नाही, अशी तक्रार करीत कंपनीविरुद्ध कामगार न्यायालयात दावा दाखल करणे सहायक व्यवस्थापकाला अंगलट आले आहे. दाव्यात नमूद केलेल्या रक्कमा कंपनीने आधीच दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर न्यायालयाने कर्मचाऱ्याला ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. कामगार न्यायालयाचे न्यायाधीश डी. ए. अरगडे यांनी हा निकाल दिला. अनुराग गुप्ता असे दंड करण्यात आलेल्या सहायक व्यवस्थापकाचे नाव आहे.

अनुराग गुप्ता यांनी ‘इंटेलक्स इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि.’ या कंपनीविरोधात दावा दाखल केला होता. गुप्ता यांनी आठ ऑक्टोबर २०१५ रोजी कंपनीतून राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर गुप्ता यांनी अडीच वर्षांनंतर कंपनीविरोधात न्यायालयात धाव घेतली. कंपनीने दोन वर्षांचा बोनस, सहा महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता, तीन महिन्यांची सी.टी.सी. रक्कम दिली नाही, असे दाव्यात नमूद करण्यात आले होते. मात्र, कंपनीने दावेदाराचे सर्व पैसे दिलेले आहेत. त्यामुळे कंपनी त्यांना देणे लागत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. कंपनीच्या वतीने ॲड. सुरेंद्र आपुणे यांनी काम पाहिले. दरम्यान, गुप्ता यांनी कंपनीकडून मिळणाऱ्या लाभासाठी आपण पात्र नाही, हे माहीत असूनही कामगार न्यायालयात दावा दाखल केला. त्यामुळे प्रतिवादी कंपनीला न्यायालयात यावे लागले. दाव्याच्या न्यायालयीन कामासाठी खर्च करावा लागला. म्हणून कामगार न्यायालयाने गुप्ता यांना पाचशे रुपये दंड ठोठावला.