पर्यावरणविषयक समूहगीत गायन स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरणविषयक समूहगीत गायन स्पर्धा
पर्यावरणविषयक समूहगीत गायन स्पर्धा

पर्यावरणविषयक समूहगीत गायन स्पर्धा

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : ॲलर्ट पुणे व वनराई यांच्यातर्फे ‘पुणे हवामान योद्धा’ या उपक्रमांतर्गत २१ जानेवारीला सकाळी ९.३० वाजता पद्मावतीजवळील अण्णा भाऊ साठे सभागृहात ‘पर्यावरणविषयक आंतरशालेय समूहगीत गायन स्पर्धा होणार आहे. स्पर्धा ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. स्पर्धेत इंग्रजी व मराठी माध्यमातील ४० शाळांनी सहभाग नोंदविला आहे. समूहगीत इंग्रजी, हिंदी किंवा मराठी भाषेत सादर करता येईल. अनमोल पृथ्वी या शब्दांचा समावेश स्व-रचित अथवा शाळांनी सादर करण्यासाठी निवडलेल्या पर्यावरणविषयक गाण्यात असावा, ही स्पर्धेची अट आहे, अशी माहिती खासदार वंदना चव्हाण यांनी दिली. आरजे बंड्या करणार सूत्रसंचालन आहेत. विद्यार्थ्यांमध्ये हवामान बदलाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.