Mon, Feb 6, 2023

शिक्षक पतसंस्थेवर
आपले विकास पॅनल
शिक्षक पतसंस्थेवर आपले विकास पॅनल
Published on : 19 January 2023, 2:22 am
पुणे : पुणे शहरातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्गासाठी १९४५ मध्ये स्थापन झालेल्या माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढीची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे हायस्कूलमध्ये नुकतीच पार पडली. या निवडणुकीत ‘आपले विकास पॅनल’ने निर्विवाद यश संपादन करत पतसंस्थेवर तब्बल ७६ वर्षांनी सत्तापरिवर्तन घडवून आणले. महिला राखीव गटातून सर्वाधिक मताधिक्य मिळवून हर्षा पिसाळ विजयी झाल्या. शिवाजी कामथे, डॉ. कल्याण वाघ, पिसाळ, डॉ. मंगल शिंदे, धोंडिबा तरटे, महादेव माने, संजय लोंढे, संदीप घोलप, दत्तात्रय हेगडकर, राज मुजावर, विजय कचरे, दत्तात्रय नाईक व पुष्पक कांदळकर यांनी निवडणुकीत विजय मिळविला.