थुंकणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थुंकणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार
थुंकणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार

थुंकणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार

sakal_logo
By

पुणे, ता. १९ ः जी २० परिषद संपली म्हणून पुन्हा शहराचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी वेळीच्या वेळी स्वच्छता करा, असे आदेश महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच जे नागरिक रस्त्यावर थुंकून घाण करतात, त्यांच्यावरची कारवाईही बंद होणार नाही. गेल्या ८ दिवसांत ३५३ जणांवर कारवाई करून ३ लाख ५३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शहरात गेल्या दोन महिन्यांपासून ‘जी २०’ परिषदेची पहिली बैठक पुण्यात झाली. या बैठकीसाठी १८ सदस्य देश, ८ निमंत्रित देश व ८ आंतरराष्ट्रीय संस्थांचे एकूण ६४ प्रतिनिधी उपस्थित होते. परिणामी, शहर स्वच्छ करण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर होते. यामुळे खड्डे बुजविणे, पादचारी मार्ग दुरुस्त करणे, राडारोडा कचरा उचलणे यासह रंगरंगोटीकडे लक्ष देण्यात आले होते. मात्र, महापालिकेने स्वच्छता केल्यानंतर बेशिस्त नागरिक रस्ते, पादचारी मार्ग, दुभाजकावर पान, गुटखा खाऊन थुंकून घाण करत आहेत. हे प्रकार थांबत नसल्याने प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला होता. नागरिकांना रंगेहाथ पकडून १ हजार रुपयांचा दंड वसूल केला. पैसे नसतील तर त्यांना स्वतःला रस्ता स्वच्छ करण्यास भाग पाडले होते.

‘जी २०’ परिषद झाली तरीही सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याची कारवाई सुरू राहणार आहे. बुधवारी २६ जणांकडून २६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर १० ते १८ जानेवारी या कालावधीत ३५३ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ३ लाख ५३ हजार रुपये दंड वसूल केला आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी घाण करून शहर अस्वच्छ करू नये.
- आशा राऊत, उपायुक्त, घनकचरा विभाग