Wed, Feb 8, 2023

मुक्तांगण विज्ञान शोधिकातर्फे
विज्ञान प्रकल्प प्रदर्शन व स्पर्धा
मुक्तांगण विज्ञान शोधिकातर्फे विज्ञान प्रकल्प प्रदर्शन व स्पर्धा
Published on : 20 January 2023, 9:38 am
पुणे, ता. २० : भारतीय विद्या भवनाच्या मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे येत्या रविवारी (ता.२२) आंतरशालेय विज्ञान प्रकल्प प्रदर्शन आणि स्पर्धेचे आयोजन केले आहे. हे प्रकल्प प्रदर्शन सेनापती बापट रस्ता येथील भारतीय विद्याभवनच्या मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रात भरणार आहे. पूना कपलिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडच्या सहव्यवस्थापकीय संचालक मेघना मुळे व पंकज मुळे यांच्या हस्ते या प्रकल्प प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता होणार आहे. हे प्रदर्शन सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे, अशी माहिती मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्राच्या उपसंचालिका नेहा निरगुडकर यांनी दिली आहे.