Sat, Jan 28, 2023

अभिनव कला महाविद्यालयात
मुद्राचित्रण कार्यशाळेचे आयोजन
अभिनव कला महाविद्यालयात मुद्राचित्रण कार्यशाळेचे आयोजन
Published on : 20 January 2023, 9:41 am
पुणे, ता. २० : टिळक रस्ता येथील अभिनव कला महाविद्यालयात रेखा व रंगकला विभागातील विद्यार्थ्यांनी ‘मुद्रा चित्रण कार्यशाळा’ (प्रिंट वर्कशॉप) आयोजित करण्यात आले. या शिबिरात प्रिंट मेकिंगमधील इचिंग तंत्र पद्धतीने मुद्रा चित्रण घेण्यात आले. या चार दिवसीय शिबिरात तन्वी चौधरी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल बळवंत, अरविंद कोळपकर, सतीश काळे, मकरंद जाधव, योगेश भास्करे (भारती कला महाविद्यालय), राहुल बोरावके, अनंत डेरे, प्रवीण ढमे, शाहू भंडारे, प्रज्ञा सोनावणे, अनिल सोनावणे, एकनाथ कदम आदी मान्यवर उपस्थित होते.