
पंचमहाभूतांवर आधारित उपक्रम आज
पुणे ः जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आणि वटपौर्णिमेनिमित्त बायोस्फिअर्स, इकोस्फिअर, व्हॉइस ऑफ वाइल्ड यांच्या पुढाकाराने आणि झपुर्झा व वनराई यांच्या सहकार्याने शनिवारी (ता. ३) दुपारी ३ ते ५ या कालावधीत झपुर्झा, कुडजे (पुणे) येथे निसर्गनाद हा पंचमहाभूतांवर आधारित उपक्रम होणार आहे. उपक्रमात पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाशतत्त्वातील नाद हा नृत्य आणि दृकश्राव्य माध्यमातून अनुभवता येणार आहे. रमेश मोगल, उपेंद्र धोंडे, मारुती गोळे, विवेक मुंडकुर आणि अथर्व पाठक यांचा सन्मान केला जाणार आहे. पर्यावरण आणि जैवविविधतेबाबत काही लघुपटांचे सादरीकरण आणि माहितीपत्रकाचे अनावरणदेखील केले जाणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याचा वर्षारंभ लक्षात घेता नृत्याच्या आणि माहितीपत्रकांच्या माध्यमातून कलाकारांकडून शिववंदना दिली जाणार आहे, अशी माहिती बायोस्फिअर्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सचिन अनिल पुणेकर यांनी दिली.