जनता सहकारी बँकेचा 
अमृतमहोत्सवी वर्ष कार्यक्रम

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्‍घाटन

जनता सहकारी बँकेचा अमृतमहोत्सवी वर्ष कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्‍घाटन

पुणे, ता. १३ ः जनता सहकारी बँक यंदा बँकिंग सेवेचे गौरवशाली अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्ताने कार्यक्रम होणार आहे. राज्याचे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्‍घाटन बुधवारी (ता. १८) होणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष रवींद्र हेजीब यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रसंगी बँकेचे संचालक सीए अभय माटे, सीए किरण गांधी, मकरंद अभ्यंकर आदी उपस्थित होते. यावेळी हेजीब म्हणाले, ‘‘ या कार्यक्रमात बँकेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बोधचिन्हाचे अनावरण व बँकेची गृहपत्रिका गरुडझेप विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे. सध्या जनता सहकारी बँकेच्या महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यात व गुजरातमधील एका जिल्ह्यात ७१ शाखा कार्यरत आहेत. शाखा विस्तार, व्यवसाय वाढ, उत्तम ग्राहक सेवा, नावीन्यपूर्ण सेवा, याबरोबरीने येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाचा स्वीकार, तंत्रज्ञान आधारित (टेक्नोबेस) सेवा ग्राहकांना सहज उपलब्ध होण्यासाठीचे प्रयत्न, डिमॅट सेवेमध्ये देशातील पहिली डिपॉझिटरी पार्टीसिपंट म्हणून बँकेने मान मिळवला आहे. बँकेने मार्च २०२३ वर्षअखेर १४ हजार २८६ कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यावसायिक उलाढाल पूर्ण केली आहे.’’

हा कार्यक्रम १८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार असून या कार्यक्रमासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव उपस्थित राहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com