sakal auto expo two days on ghatasthapana and navratri festival pune today
sakal auto expo two days on ghatasthapana and navratri festival pune todaysakal

Sakal Auto Expo : सकाळ च्या वतीने दोन दिवस 'ऑटो एक्स्पो’; वाहनांची खरेदी होणार अधिक सोपी

‘सकाळ ऑटो एक्स्पो’ आजपासून; एकाच ठिकाणी अनेक पर्याय

पुणे : आगामी सणासुदीच्या काळात नागरिकांना वाहनांची खरेदी अधिक सोपी व्हावी, म्हणून ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने दोन दिवस ‘ऑटो एक्स्पो’चे आयोजन केले आहे. घटस्थापना, नवरात्री आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर आवडते वाहन खरेदीचे स्वप्न नागरिकांना पूर्ण करता येणार आहे.

कर्वेनगरमधील डीपी रस्त्यावर असलेल्या पंडित फार्म्समध्ये शनिवारी (ता. १४) आणि रविवारी (ता. १५) एक्स्पो होणार आहे. वाहनांचे विविध पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत. तसेच नवीन गाडी घेताना खरेदीदारांना करावी लागणारी धावपळ थांबविण्यासाठी ऑटो एक्स्पो भरविण्यात येत आहे.

sakal auto expo two days on ghatasthapana and navratri festival pune today
Sakal Exclusive : ग्रामसभा व्हिडिओ अपलोड करण्यात ग्रामपंचायतींची कुचराई; 796 ग्रामपंचायतींनी फिरविली पाठ

पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक कार आणि दुचाकींचे अनेक पर्याय एक्स्पोत पाहता येणार आहेत. यामध्ये एकाच बजेटचे अनेक पर्याय उपलब्ध होत असल्याने नेमकी कोणती गाडी घ्यायची? याचा निर्णय घेणे सोपे होईल. या ठिकाणी विविध कंपन्यांच्या मोटारी आणि दुचाकी, त्यांची वैशिष्ट्ये, किमती आदींची माहिती मिळणार आहे.

sakal auto expo two days on ghatasthapana and navratri festival pune today
sakal Podcast :ऑपरेशन 'अजय'ला सुरुवात ते इस्रोत अपेक्षित पगार नाहीत

एक्स्पोमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल आणि महागड्या गाड्यांचे अनेक पर्याय उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे टेस्ट राइडचा आनंद घेत आपल्या स्वप्नातील वाहन बुक करता येईल. २०हून अधिक ब्रँडचे ६०हून अधिक मॉडेल्स उपलब्ध असतील. अर्थसाह्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत.

‘एक्स्पो’बाबत

  • कुठे? : पंडित फार्म्स, डीपी रस्ता, कर्वेनगर

  • कधी? : शनिवार (ता. १४) आणि रविवार (ता. १५)

  • वेळ : सकाळी १० ते रात्री ८

  • प्रवेश व पार्किंग मोफत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com