अवती भवती

अवती भवती

Published on

क्रिकेटपटू देविका वैद्यचा सत्कार
पुणे, ता. ३ : आशियायी क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय महिला संघातील क्रिकेटपटू देविका वैद्य हिचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सत्कार करण्यात आला. कर्वेनगर येथील देविका वैद्य हिच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला. कर्वेनगर संघचालक उदयन पाठक यांच्या हस्ते तिचा पुष्पगुच्छ व पुस्तके देऊन सन्मान केला. तसेच देविकाचे वडील पुर्नेंदू वैद्य यांचाही सत्कार केला. यावेळी मेघन बेलसरे, सुनील खेडकर, प्रकाश देशपांडे, सचिन अग्निहोत्री उपस्थित होते. चीनमध्ये झालेल्या आशियायी क्रीडा स्पर्धेत क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाने सुवर्णपदक जिंकले आणि या संघात देविका वैद्य हिचा समावेश होता.

‘पेरा प्रिमिअर’चे पारितोषिक वितरण
पुणे, ता. ३ : एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्‍नॉलॉजी विद्यापीठातील विश्‍वराजबाग येथे प्रीमिनेंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशनतर्फे (पेरा) ‘पेरा प्रिमिअर चॅम्पियनशिप’चे पारितोषिक वितरण झाले. यावेळी संजय घोडावत समुहाचे अध्यक्ष संजय घोडावत, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे उपाध्यक्ष एकनाथ खेडकर, आशियायी क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या कबड्डी संघाची खेळाडू स्नेहल शिंदे-साखरे, ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक पद्माकर फड, मुष्टियोद्धा मनोज पिंगळे, डॉ. मोहित दुबे, डॉ. वीरेंद्र शेटे, डॉ. अतुल पाटील, प्रा. डॉ. मोहन मेनन उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. सूरज भोयार यांनी केले. आभार प्रा. हनुमंत पवार यांनी मानले.
.....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.