एमआयटी विद्यापीठाचा
आज दीक्षांत समारंभ

एमआयटी विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ

Published on

पुणे, ता. ३ ः एमआयटी विश्व शांती विद्यापीठाचा पाचवा दीक्षांत समारंभ शनिवार (ता. ४) सकाळी दहा लोणीकाळभोर येथील विश्व सभामंडपात आयोजित करण्यात आला आहे. या वर्षी एकूण पाच हजार १८० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना ‘एमआयटी डब्ल्यूपीयू विज्ञान महर्षी सन्मान’ देऊन गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाला भारतीय जी २०चे शेरपा व प्रशासकीय अधिकारी अभिताभ कांत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अध्यक्षस्थानी एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड असतील. तसेच ‘माईर्स’चे संस्थापक विश्वस्त प्रा. पी. बी. जोशी, ‘एमआयटी डब्ल्यूपीयू’चे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, ‘माईर्स’च्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड व ‘एमआयटी डब्ल्यूपीयू’चे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस उपस्थित राहणार आहेत. यावेळी सोमय्या बाजपयी हिला ‘फाउंडर प्रेसिडेंट मेडल’ व अन्वेशा भट्टाचार्य हिला ‘एक्जीकेटीव्ह प्रेसिडेंट मेडल’ने गौरविण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.