सायक्लोथॉन

सायक्लोथॉन

Published on

‘सायकल फॉर स्वास्थ्यम’साठी काही तासांत ५०० जणांची नोंदणी
‘सायक्लोथॉन’चे २६ नोव्हेंबरला आयोजन; पुणेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे, ता. ३ ः शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त अशा बहुप्रतिक्षित ‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम’ उपक्रमांतर्गत येत्या २६ नोव्हेंबरला सर्व वयोगटांतील नागरिकांसाठी सुदृढ आरोग्याच्या जनजागृतीसाठी दहा किलोमीटर अंतराची ‘सायक्लोथॉन’ होणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अवघ्या काही तासांत ५०० जणांची निःशुल्क नोंदणी झाली आहे. आता सशुल्क नोंदणी सुरु झाली आहे.
पुण्यातील कर्वे रस्ता येथील पंडित फार्म्स येथून २६ नोव्हेंबरला (रविवारी) सकाळी सात वाजता ‘सायक्लोथॉन’ला सुरवात होईल. सकाळी नऊ वाजता पंडित फार्म्स येथेच सायक्लोथॉनचा समारोप होईल. सशुल्क नोंदणीद्वारे सहभागी घेणाऱ्या स्पर्धकांना अल्पोपाहार, टी- शर्ट, भाडेतत्त्वावर सायकल सुविधा (पहिल्या १०० जणांसाठी) आणि प्रमाणपत्र दिले जाईल.
‘स्वास्थ्यम’ या गेल्या वर्षी लोकप्रिय व बहुचर्चित ठरलेल्या उपक्रमाचे दुसरे पर्व १, २ आणि ३ डिसेंबरला कर्वेनगर येथील डीपी रोड जवळील पंडित फार्म्स येथे होणार आहे. ‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम’ उपक्रमाचे मुख्य प्रायोजक ‘सुहाना मसाले’ तर पॉवर्ड बाय प्रायोजक ‘भारती विद्यापीठ’, सहयोगी प्रायोजक चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि’., फायनान्शियल हेल्थ पार्टनर ‘लोकमान्य मल्टिपर्पज को - ऑप. सोसायटी लि. (मल्टी स्टेट)’ आहेत. याचबरोबर ऊर्जा पार्टनर म्हणून ‘निरामय वेलनेस सेंटर’, हेल्थ पार्टनर ‘शारंगधर नॅचरल हेल्थ केअर’, आणि ईव्ही पार्टनर ‘एथर’ आहेत. संयोजनासाठी ‘फिटनेस कल्चर’ ने साहाय्य केले आहे.
---
सहभागाची प्रत्येकाला संधी
सुदृढ आरोग्यासाठी जनजागृती व स्वास्थ्यपूर्ण आरोग्याचा संदेश देण्यासाठी दहा किलोमीटर ‘सायक्लोथॉन’ मध्ये सर्व वयोगटांतील नागरिक सहभागी होऊ शकतात. भाग घेण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करून सशुल्क नावनोंदणी करता येईल.
---­--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.