‘द. मा. मिरासदार पुरस्कार’
मकरंद टिल्लू यांना जाहीर

‘द. मा. मिरासदार पुरस्कार’ मकरंद टिल्लू यांना जाहीर

पुणे ः द. मा. मिरासदार प्रतिष्ठानतर्फे प्रख्यात साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून यंदाच्या वर्षापासून ‘द. मा. मिरासदार पुरस्कार’ देण्यात येणार आहे. एकपात्री कलाकार व हास्ययोग प्रशिक्षक मकरंद टिल्लू यांना यंदाचा पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र मंकणी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. रोख रुपये अकरा हजार, मानपत्र व सन्मानचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या शनिवारी (ता. १५) सायंकाळी ६ वाजता पेरुगेट भावे प्रशालाच्या डॉ. प्र. ल. गावडे सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांचे ‘द. मा. मिरासदार आठवणी व किस्से’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

चंद्रकांत काळे यांना बलराज साहनी पुरस्कार
पुणे ः बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशनतर्फे गायक व अभिनेते चंद्रकांत काळे यांना ‘बलराज साहनी पुरस्कार’ जाहीर झाला आहे. येत्या रविवारी (ता. १६) सायंकाळी ५.३० वाजता सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या पोतदार सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. यावेळी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते काळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. काळे यांनी ‘घाशीराम कोतवाल’, ‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’, ‘तीन पैशाचा तमाशा’, ‘वाऱ्यावरची वरात’ आदी नाटकांमध्ये भूमिका केल्या. ‘जैत रे जैत’, ‘सिंहासन’ आदी गाजलेल्या चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनय केला. शब्दवेध संस्थेतर्फे त्यांनी साहित्य व कलेवर आधारित विविध कार्यक्रम सादर केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com