नुकसान भरपार्इसाठी विमा कंपनीसह
कार चालक, मालक जबाबदार

कर्त्या मुलगा गमावलेल्या वृद्ध आर्इला मिळाले ३५ लाख रुपये

नुकसान भरपार्इसाठी विमा कंपनीसह कार चालक, मालक जबाबदार कर्त्या मुलगा गमावलेल्या वृद्ध आर्इला मिळाले ३५ लाख रुपये

पुणे, ता. १० : कारचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या कुटुंबीयांना ३५ लाखांची नुकसान भरपार्इ द्यावी, असा आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाने कार चालक, मालक आणि विमा कंपनीला दिला आहे. नियंत्रण सुटून अपघात झाल्याने नुकसान भरपार्इ देण्यासाठी न्यायाधिकरणाने चालक आणि कार मालकाला देखील जबाबदार धरले आहे.
न्यायाधिकरणाचे अध्यक्ष श्‍याम चांडक यांनी हा निकाल दिला.
या निकालामुळे आईची होणारी परवड थांबून लहान भावांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग खुला झाला आहे. तरुणाच्या कुटुंबीयांना ३४ लाख ७५ हजार ३७७ रुपये नुकसान भरपाई मिळाली. आदिल नासीर पटेल यांचा या अपघातात मृत्यू झाला होता. ते एका खासगी कंपनीत नोकरीला होते. पटेल हे ११ मार्च २०१६ ला आपल्या मित्रांसोबत हांडेवाडी रस्त्याने कारमधून प्रवास करत होता. यावेळी, कारचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील गाडी इलेक्ट्रिकच्या खांबावर आदळली. यामध्ये पाठीमागच्या सीटवर बसलेल्या पटेल यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. घरातील कर्ता व्यक्ती गमावल्याने त्यांच्या कुटुंबीयांची अ‍ॅड. वैभव धायगुडे पाटील यांच्यामार्फत न्यायाधिकरणात कारचे चालक, मालक आणि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीविरोधात नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता.
नुकसान भरपाई देण्याचे दायित्व अ‍ॅड. धायगुडे यांनी सबळ पुरावे तसेच साक्षीदार हजर करून सिद्ध केले. त्यानुसार न्यायालयाने चालक, मालक तसेच विमा कंपनीस एकत्र जबाबदार धरून २४ लाख ७५ हजार ४५२ रुपये नुकसान भरपाई दावा दाखल केल्यापासून व्याजासहित देण्याचा निकाल दिला. हा दावा २० जून २०१६ ला दाखल झाला होता. त्यामुळे तिघांनी ३४ लाख ७५ हजार ३७७ रुपये कुटुंबीयांकडे सुपूर्त केले.

आर्इच्या नावाने २५ लाखांची एफडी
नुकसान भरपार्इ म्हणून मिळालेल्या रकमेतील २५ लाख रुपये वृद्ध आर्इच्या उपजीविकेसाठी मुदत ठेव खात्यात (एफडी) ठेवण्यात आले आहेत. तर काही पैसे पटेल यांच्या लहान भावाच्या शिक्षणावर खर्च करणार असल्याची माहिती ॲड. धायगुडे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com