सारसबागेत प्रवेशद्वारावर डबे तपासण्याचे आदेश

सारसबागेत प्रवेशद्वारावर डबे तपासण्याचे आदेश
Published on

पुणे, ता. २२ : बासी ईदनिमित्त उद्या (रविवार) सारसबागेत मांसाहार होऊ नये, यासाठी प्रवेशद्वारावरच डबे तपासावेत, असा आदेश पोलिस प्रशासनाने आज काढला. डबे तपासण्यासाठी तब्बल दीडशे पोलिस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा सारसबागेत तैनात असणार आहे.

देशभरात शनिवारी रमजान ईद उत्साहाने साजरी झाली. ईदच्या दुसऱ्या दिवशी बासी ईद असते. दरवर्षी यादिवशी उद्यानांमध्ये जेवण्याची प्रथा आहे. सारसबागेत पेशवेकालीन गणपती मंदिर असल्याने तेथे मांसाहारावर बंदी आहे. उद्यानातही मांसाहाराची परवानगी देऊ नये, अशी मागणी काही संघटनांनी पोलिसांकडे केलेली होती.

पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी या संदर्भात पुणे महापालिकेला माहिती दिली. मात्र, डबे तपासण्याचे नियोजन व मांसाहारास प्रतिबंध घालण्याची जबाबदारी पोलिस कर्मचाऱ्यांवर आहे, महापालिकेवर नाही, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.

पोलिसांकडून या संदर्भात दोन दिवसांपूर्वी महापालिकेला माहिती देण्यात आलेली आहे. डबे तपासणी पोलिसांकडून केली जाणार आहे; महापालिकडून नाही.
- अशोक घोरपडे, अधिक्षक, उद्यान विभाग

सारसबागेत गणपती मंदिर असल्यामुळे दरवर्षी ही खबरदारी घेतली जाते. येथे मांसाहारास बंदी आहे. यावर्षी पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. काही नागरिक मांसाहाराचे डबे घेऊन येत असल्याची तक्रार संघटनांनी केली होती. त्यामुळे आम्ही उद्या सारसबाग येथे १५० पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे. महापालिकेलाही मनुष्यबळ देण्यास सांगितले आहे. सारसबाग येथे येणाऱ्या नागरिकांचे डबे तपासले जातील.
- अशोक इंदलकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्वारगेट पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur city
A proposal to place all women coaches together and introduce 'Pink Stopping Points' at railway stations is under consideration to strengthen women's safety in Mumbai suburban trains.
dj free solapur
 Nagpur Traffic Police Must Carry Service Gun During Duty
Marathi News Esakal
www.esakal.com