दक्षिण पुण्याचा गुरुवारी पाणी पुरवठा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दक्षिण पुण्याचा गुरुवारी पाणी पुरवठा बंद
दक्षिण पुण्याचा गुरुवारी पाणी पुरवठा बंद

दक्षिण पुण्याचा गुरुवारी पाणी पुरवठा बंद

sakal_logo
By

पुणे, ता. २४ ः कात्रज- कोंढवा रस्ता, राजस सोसायटी चौक व कात्रज चौकातील मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती आणि पद्मावती पंपिंग स्टेशन येथे देखभाल-दुरुस्ती, फ्लो मीटर बसविणे आदी विविध कामांमुळे गुरुवारी (ता. २७) कात्रज व कोंढवा बुद्रूक, राजीव गांधीनगर, अप्पर, सुपर इंदिरानगर, धनकवडी, संभाजीनगर, बिबवेवाडी परिसरामध्ये होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी (ता. २८) सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, याची दखल घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
कात्रज-कोंढवा बुद्रूक, अप्पर इंदिरानगर परिसर, कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, गुजरवाडी रोड, वरखडेनगर, उत्कर्ष, राजस, भूषण, इंद्रप्रस्थ सोसायटी, माऊलीनगर, विद्यानगर, आनंदनगर सुखसागरनगर भाग-१ व २ शिवशंभोनगर, गोकुळनगर, साईनगर, गजानननगर, काकडे वस्ती, ग्रीन पार्क, राजीव गांधीनगर व अप्पर इंदिरानगरचा काही भाग, इस्कॉन मंदिर परिसर, टिळेकरनगर, कोंढवा बुद्रूक, लक्ष्मीनगर, सोमजी बस स्टॉप परिसर, पुण्यधाम आश्रम रस्ता, पारगेनगर, खडीमशीन परिसर, येवलेवाडी, कामठे-पाटील नगर तसेच तळजाई, धनकवडी, बिबवेवाडी, संभाजीनगर, गुलाबनगर, चैतन्यनगर परिसर, काशिनाथ पाटील नगर, लोअर इंदिरानगर, अप्पर व सुपर इंदिरानगर, चिंतामणीनगर, स्टेट बँक नगर, लेक टाऊन सोसायटी, महालक्ष्मीनगर, दामोदर सोसायटी, महेश सोसायटी, मनमोहन पार्क, ओम अभिषेक सोसायटी, नीलकमल सोसायटी, मानस सोसायटी येथील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.