पाच लाखांच्या खंडणीसाठी
ग्रामसेवकाचे अपहरण

पाच लाखांच्या खंडणीसाठी ग्रामसेवकाचे अपहरण

पुणे, ता. २९ : ग्रामसेवकाचे पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून त्यास व त्याच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देत त्यास जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. २६) सायंकाळी साडेसहा वाजता उत्तमनगर व कुडजे परिसरात घडली.

याप्रकरणी विकास प्रकाश गायकवाड (वय ३८, रा. कुडजे) व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामसेवक महेशकुमार नानासाहेब खाडे (वय ३९, रा. दत्तनगर, आंबेगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ही घटना २६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नटराज हॉटेल व दगडे फार्म हाऊस, कुडजे परिसरात घडली.

फिर्यादी खाडे हे कुडजे घेरा येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. तर आरोपी गायकवाडदेखील कुडजे येथील राहणारा आहे. त्याने गेल्या काही दिवसांपूर्वी गावात झालेल्या विकासकामांबाबत माहिती अधिकाराद्वारे माहिती मागितली होती. दरम्यान, २६ एप्रिल रोजी खाडे हे त्यांच्या गाडीतून घरी जात होते. उत्तमनगर येथील नटराज हॉटेलजवळ त्यांची गाडी आल्यानंतर एकाने त्यांच्या गाडीला दुचाकी आडवी लावली. गाडी थांबल्यानंतर त्यांनी ‘‘तू हॉर्न का वाजवला, आम्ही मुळशीचे आहोत,’’ असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी गायकवाड तेथे आला. त्याने ‘‘भाऊसाहेब आपल्या ओळखीचे आहेत. त्यांना काही बोलू नका, आपण सरपंचाच्या हॉटेलवर हा विषय मिटवू,’’ असे सांगून त्यांना दगडे फार्म येथे नेले. तेथे गेल्यानंतर त्यांनी खाडे यांना शिवीगाळ करीत पाच लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास स्वतः विष पिऊन आत्महत्या करायची असे धमकाविले. खाडे यांना बांधून ठेवून विष पाजण्याचाही प्रयत्न केला. खाडे यांना मारहाण करून त्यांच्या मित्राकडून ७३ हजार रुपये स्वत:च्या खात्यात जमा करून घेतले. दरम्यान, रात्री साडेअकरा वाजता खाडे यांची सुटका केली. तसेच पैसे न दिल्यास कुटुंबाला संपवून टाकू, अशी धमकीही आरोपींनी दिली. दरम्यान, उत्तमनगर पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी तपास सुरू केला. तर एकेठिकाणी त्यांना खाडे यांची गाडी व मोबाईल मिळून आला. त्यांनी घरी संपर्क साधल्यानंतर घडलेला प्रकार पुढे आला. मात्र, या घटनेमुळे खाडे घाबरले होते, त्यामुळे फिर्याद देण्यास विलंब झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com