‘रॅप’ची चौकशी करून माहिती द्या
अधिसभा सदस्यांची मागणी; विद्यापीठाला सूचविल्या उपाययोजना

‘रॅप’ची चौकशी करून माहिती द्या अधिसभा सदस्यांची मागणी; विद्यापीठाला सूचविल्या उपाययोजना

पुणे, ता. २ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आक्षेपार्ह शब्दांचा वापर केलेल्या ‘रॅप’ गाण्याच्या चित्रीकरणावरून निर्माण झालेले प्रश्न अद्यापही अनुत्तीर्णच आहे. असे असतानाच आता अधिसभा सदस्यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करून माहिती समोर आणावी, अशी मागणी उचलून धरली आहे.

या प्रकरणी विद्यार्थी-पालक अधिसभा सदस्यांना विचारणा करत आहेत. त्यामुळे नेमके काय घडले, हे जाणून घेण्यासाठी अधिसभा सदस्यांच्या शिष्टमंडळाने विद्यापीठात प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांची नुकतीच भेट घेतली. यामध्ये दादाभाऊ शिनलकर, गणपत नांगरे, डॉ. राजेंद्र झुंजारराव, डॉ. समीर भोसले यांचा समावेश होता. या वेळी विद्यापीठाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीबाबत अधिसभा सदस्यांना माहिती देण्यात आली.

अधिसभा सदस्यांच्या सूचना
- विद्यापीठाच्या परिसरात बाहेरील व्यक्तींच्या वावराबाबत सतर्कता बाळगावी
- विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थी प्रतिनिधी, संघटना यांच्याशी संवाद आवश्यक
- या प्रकरणाची सखोल चौकशी करून नेमके प्रकरण समोर आणावे
- सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीबाबत तत्काळ निर्णय घ्यावा
- याची अधिकृतरीत्या माहिती अधिसभा सदस्यांना मिळावी

या प्रकरणात नेमके घडले काय, हे जाणून घेण्यासाठी शिष्टमंडळाने विद्यापीठाच्या मुख्य इमारतीला भेट दिली. सुरक्षा कर्मचाऱ्यांसह प्र-कुलगुरू आणि कुलसचिव यांच्याशी चर्चा केली. विद्यापीठातील हालचालींबाबत अधिसभा सदस्यांना माहिती मिळत नाही, पण बैठकीची माहिती बाहेर जाते कशी, हा प्रश्नही या वेळी उपस्थित करण्यात आला. विद्यापीठाच्या सुरक्षेच्या दृष्टीने शिष्टमंडळाने उपाययोजना सुचविल्या आहेत. तसेच सर्व प्रकाराची सखोल चौकशी त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
- दादाभाऊ शिनलकर, अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

रॅप गाण्याच्या चित्रीकरणाला नक्की कोणी परवानगी दिली?, कोणाच्या मान्यतेने मुख्य इमारतीमधील सभागृहात हे चित्रीकरण झाले? याची सखोल चौकशी त्वरित करून चौकशीतील माहिती समोर आणावी, अशी मागणी केली आहे. तसेच विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनात झालेली तोडफोड ही क्षमापात्र नाही. आंदोलनकर्ते बैठक सुरू असताना आत येण्यापूर्वीच त्यांना थांबविणे आवश्यक होते. विद्यार्थ्यांची संवाद साधणे गरजेचे होते. याबाबत विद्यापीठ प्रशासनाशी चर्चा करण्यात आली.
- गणपत नांगरे, अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com