देश-विदेशातील वाद्यांशी रसिक झाले ‘कनेक्ट’

देश-विदेशातील वाद्यांशी रसिक झाले ‘कनेक्ट’

पुणे, ता. २ ः सुमधूर जलतरंग, सुरेल व्हायोलिन अन्‌‍ हार्मोनियम, तालाचे वैविध्य दर्शविणाऱ्या तबला, ड्रम्स, मृदंगम्‌, घटमची दमदार साथ, सूर-लयीची नजाकत दाखविणारे गायन, यांचा मिलाफ ऐकून रसिक स्तिमित झाले. निमित्त होते, ‘डिव्हाईन कनेक्ट’ मैफलीचे. व्हर्सटाईल इंग्लिश मीडियम स्कूल अंतर्गत असलेल्या कला आणि क्रीडा अकादमीतर्फे या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.

प्रा. संजय निकम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या मैफलीत गायन, वादन आणि देश-परदेशातील वाद्यांची गुंफण करण्यात आली होती. जलतरंग वादक पं. मिलिंद तुळाणकर, युवा गायिका रुचिरा केदार, संवादिनी वादक मिलिंद कुलकर्णी, युवा तबलावादक गणेश तानवडे, मृदंगम्-घटम्‌‍ वादक पंचम उपाध्याय, की-बोर्ड व व्हायोलिनवादक अमन वरखेडकर आणि ड्रम्सवादक जय निकम यांनी मैफल सादर केली. कार्यक्रमाचा शुभारंभ ज्येष्ठ तबलावादक पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. याप्रसंगी प्रा. संजना निकम व प्रा. संजय निकम उपस्थित होते. अभिनेत्री ऋतुजा फुलकर यांनी कलाकारांशी संवाद साधत कार्यक्रमाचे निवेदन केले. पं. तळवलकर म्हणाले, ‘‘हिंदुस्थानी, कर्नाटक संगीताचा मिलाफ करून विचारांनी एकत्र येण्याचा हा अनोखा प्रयोग आहे. कलाकाराला विद्या कलेपर्यंत नेता आली पाहिजे, कारण विद्या ही बाहेरून आत येते, तर कला ही आतून स्फुरते. याचे गणित साधता आले तर कलाकारालाही सादरीकरणातून आनंद घेता येतो आणि त्यातूनच श्रोत्यांनाही आनंद मिळतो.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com