संदीप आगवेकर यांना 
साहिर लुधियानवी पुरस्कार

संदीप आगवेकर यांना साहिर लुधियानवी पुरस्कार

पुणे ः बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा ‘साहिर लुधियानवी पुरस्कार’ गायक संदीप आगवेकर यांना जाहीर झाला आहे. येत्या रविवारी (ता. ७) सायंकाळी ६ वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. फाउंडेशनचे सचिव सुरेश टिळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. संदीप आगवेकर हे गेली १८ वर्षे गायक म्हणून पुण्यासह विविध शहरांतील संगीत कार्यक्रमांत सहभागी होत आहेत. ज्येष्ठ शास्त्रीय गायक उपेंद्र भट यांचे ते शिष्य आहेत.

रुणवाल सिगल सोसायटीच्या ग्रंथालयाचे उद्‌घाटन
पुणे ः रुणवाल सिगल हाउसिंग सोसायटीच्या ग्रंथालयाचे उद्‌घाटन कवी व लेखक दीपक करंदीकर यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने झाले. यावेळी कर्नल राजेंद्र सावंत यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. ‘आधुनिक काळाच्या गरजेनुसार मोठ-मोठ्या सोसायट्यांमधून छोट्याशा ग्रंथालयांची निर्मिती आवश्यक आहे’, असे प्रतिपादन करंदीकर यांनी केले. याप्रसंगी सोसायटीच्या सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष राजेंद्र जाधव व सचिव आकांक्षा देशपांडे आदी उपस्थित होते. संगीता शेंडे-कदम यांनी सूत्रसंचालन केले.

बंधुता काव्य महोत्सवाच्या अध्यक्षपदी संगीता झिंजुरके
पुणे ः राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेतर्फे आयोजित पाचव्या बंधुता काव्य महोत्सवाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री संगीता झिंजुरके यांची, तर स्वागताध्यपदी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. हरिश्चंद्र गडसिंग यांची निवड करण्यात आली आहे. परिषदेचे संस्थापक बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी ही माहिती दिली. झिंजुरके यांचे ‘संज्योती आणि वादळ मनातले’, ‘शब्द तुषार’, ‘व्यथा स्त्रीवेदनेच्या’, ‘काव्यस्पंदन’ हे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. डॉ. हरिश्चंद्र गडसिंग यांनी ११ व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद भूषविले होते.

मर्दानी खेळांच्या प्रशिक्षण शिबिराचे उद्‌घाटन
पुणे ः अखिल मंडई मंडळातर्फे आयोजित मर्दानी खेळांच्या प्रशिक्षण शिबिराचे उद्‌घाटन विश्रामबाग पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील माने यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थितांनी लाठीकाठी, तलवारबाजीची चित्तथरारक प्रात्यक्षिके अनुभवली. याप्रसंगी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, प्रशिक्षक कुंडलिक कचाले, मंडळाचे विश्वस्त विश्वास भोर, पीयूष शहा, सूरज थोरात, प्रणव मलभारे, ओम थोरात, हरीश मोरे उपस्थित होते. लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा, भाला चालवणे आदी खेळांचे प्रशिक्षण शिबिरात देण्यात येणार आहे. माने म्हणाले, ‘‘मंडळातर्फे अतिशय चांगला उपक्रम राबविण्यात आला आहे. मर्दानी खेळांच्या प्रशिक्षणामुळे मुलांची शारीरिक क्षमता वाढते आणि स्वसंरक्षण देखील करता येते. मुलांसह विशेष करून मुलींनी देखील असे प्रशिक्षण घेणे ही आजच्या काळात गरजेचे आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com