शिवसृष्टी पाहण्यासाठी विद्यार्थी, पालकांना सवलत

शिवसृष्टी पाहण्यासाठी विद्यार्थी, पालकांना सवलत

पुणे, ता. २ ः महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे नऱ्हे-आंबेगाव येथे साकारत असलेली शिवसृष्टी पाहण्यासाठी शालेय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना विशेष सवलत देण्यात येणार आहे. आजपासून ६ जूनपर्यंत, म्हणजेच शिवसाम्राज्य दिनोत्सवापर्यंत ही सवलत दिली आहे.
महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याप्रसंगी प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर, शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार उपस्थित होते. शिवजयंतीदिनी शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे अर्थात सरकारवाड्याचे लोकार्पण झाल्यानंतर हा टप्पा खुला केला आहे. यात सध्या विद्यार्थ्यांसाठी १२० रुपये प्रति व्यक्ती आणि प्रौढांसाठी ३५० रुपये प्रति व्यक्ती, असा तिकीट दर आकारला जातो. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास शालेय विद्यार्थ्यांना आपल्या पालकांसोबत अनुभवता यावा, या उद्देशाने शाळांच्या सुट्ट्यांमध्ये शिवसृष्टीची सफर करताना आम्ही विशेष सवलत देत आहोत. या अंतर्गत येत्या ६ जूनपर्यंत शालेय विद्यार्थ्यांना ८० रुपये आणि त्यांच्या पालकांना २५० रुपये असे प्रवेश शुल्क आकारणार आहे. तसेच, एकावेळी १० जणांनी नोंदणी केल्यास त्यांच्याकडून प्रत्येकी २०० रुपये प्रति व्यक्ती, असे प्रवेश शुल्क आकारणार असल्याची माहिती कदम यांनी दिली. शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून ६ जून २०२४ पर्यंत लोकार्पण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com