आपत्तकालासाठी लष्करी रुग्णालय सज्ज 

‘एएफएमसी’च्या अमृत महोत्सवात लेफ्टनंट जनरल दलजीत सिंग यांचे प्रतिपादन

आपत्तकालासाठी लष्करी रुग्णालय सज्ज ‘एएफएमसी’च्या अमृत महोत्सवात लेफ्टनंट जनरल दलजीत सिंग यांचे प्रतिपादन

पुणे, ता. २ ः ‘‘कोरोना काळात लष्करी रुग्णालयांद्वारेही सामान्य नागरिकांना सेवा पुरविली होती. भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास सशस्त्र दलांच्या रुग्णालय केवळ जवानांना व त्यांच्या कुटुंबीयांनाच नाही तर आवश्‍यकतेनुसार सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी ही सदैव तत्पर राहणार. त्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळ, सुविधा आणि उपकरणे उपलब्ध असून लष्करी रुग्णालये सज्ज आहेत,’’ असे सशस्त्र दल वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल दलजीत सिंग यांनी सांगितले.

येथील सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाचा (एएफएमसी) अमृत महोत्सव नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन लेफ्टनंट जनरल सिंग यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एएफएमसीद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम एएफएमसीचे संचालक व प्रमुख लेफ्‍टनंट जनरल नरेंद्र कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. या दोन दिवसीय कार्यक्रमात फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व संस्थापक नवीन जिंदाल, लेफ्टनंट जनरल डी. पी. वत्स (निवृत्त) आदी उपस्थित होते. यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील शोधनिबंध सादर केला. चर्चा सत्राचे आयोजन केले होते. त्यामध्‍ये विविध मान्यवरांनी सहभाग घेत वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्ताची प्रगती आदी विषयांवर चर्चा केली. तसेच एएफएमसीचे माजी विद्यार्थी डॉ. प्रबीर रॉय चौधरी, डॉ. रूबी पवनकर यांनी मार्गदर्शन केले.

लेफ्टनंट जनरल सिंग म्हणाले, ‘‘वैद्यकीय शिक्षण व संशोधनातील उत्कृष्टतेचे केंद्र असलेल्या सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाने (एएफएमसी) देशातील सर्वोच्च वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एक म्हणून स्वतःची स्थापना केली आहे. जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ट वैद्यकीय प्रशिक्षण संस्थांमध्ये एएफएमसी हे ३७ व्या क्रमांकावर असल्याचे नुकतेच सीईओवर्ल्ड मासिकेनुसार स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही देशासाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरत आहे.

सशस्त्र दलातील जवानांच्या डीएनए संकलनाबाबत माहिती देताना ते म्हणाले, ‘‘डीएनए संकलनाची प्रक्रिया ही सातत्याने पार पडणारी आहे. ती सध्या सुरू असून एएफएमसीच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागामध्ये हे डीएनएचे नमुने संकलित करून ठेवले जात आहेत. महत्त्वाचे म्हणजेच या डीएनए संकलनामुळे आतापर्यंत १२ हुतात्मा जवानांची ओळख पटविण्यास मदत झाली आहे. दरम्यान, पायलट डॉक्टर प्रकल्पाबाबत सांगायचे झाले तर सध्या लढाऊ, वाहतूक विमानांसह हेलिकॉप्टर, असे प्रत्येकी दोन वैमानिक डॉक्टरांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रयोगाच्‍या प्रतिसादानुसार पुढे या प्रकल्पाचा विकास केला जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com