सहा हजार हरकती-सूचना प्राप्त

सहा हजार हरकती-सूचना प्राप्त

पुणे, ता. २ : फुरसुंगी व उरुळी देवाची या दोन गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याबाबत राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या अधिसूचनेवर हरकती-सूचना देण्याची मुदत दोन दिवसांपूर्वी संपुष्टात आली. दरम्यान, यावर सुमारे सहा हजार नागरिकांनी आपल्या हरकती-सूचना दाखल केल्या आहेत. महिनाभराच्या कालावधीत या हरकती-सूचना प्राप्त झाल्या आहेत. आलेल्या अर्जांची छाननी करून त्या नोंदविण्याचे काम सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले. दाखल झालेल्या हरकतींवर जिल्हाधिकारी सुनावणी घेऊन त्याचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. राज्य शासनाकडून यावर विचार होऊन फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषद स्थापन करण्याबाबची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी आणखी काही कालवधी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com