दक्षिण मुख्यालयाच्या प्रमुखांची अपशिंगे गावाला भेट

दक्षिण मुख्यालयाच्या प्रमुखांची अपशिंगे गावाला भेट

पुणे, ता. २ ः लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह यांनी नुकतेच साताऱ्यातील अपशिंगे या गावाला भेट दिली. या वेळी सिंह यांच्या हस्ते गावात उभारण्यात आलेल्या शैक्षणिक केंद्र व व्यायाम शाळेचे उद्‍घाटन करण्यात आले.

महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एच. एस. कहलोन, षण्मुखानंद कला आणि संगीत सभा संस्थेचे अध्यक्ष डॉ. व्ही शंकर या प्रसंगी उपस्थित होते. लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी गावात या सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. सध्या अग्निपथ योजनेच्या अनुषंगाने तरुणांना शैक्षणिक तसेच शारीरिक तंदुरुस्तीसाठी अधिक भर द्यावा लागत आहे. या दृष्टीकोनातून जिल्ह्यामधील तरुणांना भरतीचे प्रशिक्षण योग्यरित्या मिळाले म्हणून षण्मुखानंद कला आणि संगीत सभा व साउथ इंडियन एज्युकेशन सोसायटीतर्फे गावात सुविधा केंद्र उपलब्ध करण्यात आले आहे.

जवानांचे गाव म्‍हणून ओळख
अपशिंगे गावाची लोकसंख्या सुमारे तीन हजार आहे. गावातील प्रत्येक कुटुंबातील किमान एक सदस्य लष्करात कार्यरत आहेत. त्यामुळे या गावाला जवानांचे गाव म्हणूनही ओळखले जाते. या गावातील ४६ जवानांनी पहिल्या जागतिक महायुद्धात शौर्याची कामगिरी केली होती. तसेच १९६२ च्या भारत-चीन युद्धासह १९६५ आणि १९७१ दरम्यान पाकिस्तानशी झालेल्या युद्धांमध्ये या गावातील अनेक जवान हुतात्मा झाले होते. दरम्यान, लहानपणापासूनच गावातील मुलांनाही लष्करात भरती होण्यासाठी प्रोत्साहन व प्रशिक्षण देण्यात येते. देशासाठी करण्यात आलेल्या या महत्त्वाच्या कामगिरीमुळे या गावाला ‘षण्मुख शौर्य पुरस्कारा’ने गौरविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com