सचिंद्र प्रताप सिंह ‘पीएमपी’चे नवे अध्यक्ष

सचिंद्र प्रताप सिंह ‘पीएमपी’चे नवे अध्यक्ष

Published on

पुणे, ता. ६ ः ‘पीएमपी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांची समाज कल्याण विभागाच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी पशू संवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची नियुक्ती करण्यात आली. गुरुवारी दुपारी ‘पीएमपी’चा अतिरिक्त कार्यभार असलेले महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांच्याकडून सचिंद्र सिंह यांनी पदभार स्वीकारला. बकोरिया यांचा कार्यकाळ केवळ नऊ महिन्यांचा राहिला. ‘पीएमपी’च्या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ पूर्व न करता पाय उतार होण्याची परंपरा यंदाही कायम राहिली आहे.
ओमप्रकाश बकोरिया यांनी ‘पीएमपी’चा पदभार स्वीकारल्यापासून पीएमपीला मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. ‘पीएमपी’चा नफा वाढविण्याआधी त्यांनी तोट्यात असणारे मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ठेकेदारांच्या लांब पल्यांच्या मार्गावरच्या बस बंद केल्या. परिणामी ‘पीएमपी’च्या खर्चात बचत होत राहिली. मात्र, ‘पीएमपी’च्या ठेकेदारांचे मात्र नुकसान होत गेले. याचे पर्यवसान ठेकेदारांच्या चालकांनी वेतन न मिळाल्याचे कारण सांगत संप घडवून आणला. येथूनच बकोरिया विरुद्ध ठेकेदार असा संघर्ष सुरु झाला. गुरुवारी अखेर बकोरिया यांची बदली झाली. सचिंद्र सिंह हे गेल्या सहा महिन्यांपासून बदलीच्या प्रतीक्षेत होते. ‘पीएमपी’चा पदभार स्वीकारल्यानंतर कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

बकोरिया यांचाही कार्यकाळ अपूर्ण
मावळते अध्यक्ष ओम प्रकाश बकोरिया यांचाही ‘पीएमपी’तील कार्यकाळ पूर्ण होऊ शकला नाही. १४ ऑक्टोबर २०२२ रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. अवघ्या नऊ महिन्यातच त्यांना पायउतार व्हावे लागले. ‘पीएमपी’ला लाभलेल्या अध्यक्षामध्ये कार्यकाळ पूर्ण करणाऱ्यांमध्ये दोन व्यक्तीचा समावेश होतो. यात आर. एन. जोशी (तीन वर्षांहून अधिक) व नयना गुंडे (२९ महिने) यांचा समावेश आहे. सर्वांत कमी काळ अश्विनीकुमार यांचा राहिला आहे. ते तीन महिने पदावर होते.

हे निर्णय ठरले महत्त्वाचे
- ‘पीएमपी’ची संचलनातील तूट कमी करण्यासाठी पुणे महापालिका व पिंपरी चिंचवड महापालिका सह ‘पीएमआरडीए’ला सहभागी करून घेतले
- यामुळे ‘पीएमआरडीए’ क्षेत्रात तोट्यात असणाऱ्या प्रवासी सेवेच्या बदल्यात ‘पीएमआरडीए’ वर्षाला १८७ कोटी रुपये मागणी करून ती मंजूर करून घेतले.
- प्रवाशांना चांगली सेवा मिळावी, ब्रेकडाउनचे प्रमाण कमी व्हावे म्हणून गाडीच्या देखभाल व दुरुस्तीवर विशेष लक्ष.
- सात मार्गावर पर्यटन बस सेवा सुरू.
- रात्रीच्या व पहाटेच्या वेळी विना प्रवासी धावणाऱ्या बस फेऱ्या रद्द
- नवीन मार्गावर सेवा सुरु व अस्तित्वात असलेल्या मार्गाचे विस्तारीकरण
- गेल्या चार वर्षांपासून रखडलेला ‘पीएमपी’च्या स्टील थांब्याचा प्रश्न सोडविला.
- ‘आयटीएमएस’ व गुगलसारख्या सेवा देण्यासाठी पुढाकार
- प्रवासी सेवा सुधारण्यावर सातत्याने भर, कर्मचाऱ्यांनी प्रवाशांशी सौजन्याने वागावे यासाठी समुपदेशनावर भर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.