‘पीएमपी’च्या दोन मार्गांचा विस्तार

‘पीएमपी’च्या दोन मार्गांचा विस्तार

Published on

पुणे, ता. ६ ः प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपी प्रशासनाने दोन बस मार्गांचा विस्तार केला आहे. यात मार्ग क्रमांक १७९ हडपसर ते विमाननगर या मार्गाचा विस्तार लोहगावपर्यंत तर मार्ग क्र. २२५ हिंजवडी माण फेज ३ ते विमाननगर या मार्गाचा विस्तार खराडीगावापर्यंत केला आहे. गुरुवारपासून हा बदल केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मार्गाचा विस्तार करण्याची मागणी होत होती. प्रवासी संख्येचा विचार करता पीएमपी प्रशासनाने हा निर्णय घेतला. त्यामुळे प्रवाशांची सोय झाली आहे.

बसचा तपशील :
- मार्ग क्रमांक १७९ ः हडपसर ते लोहगाव
मार्ग- सिंबायोसिस कॉलेज, विमाननगर, लोहगाव विमानतळ, केंद्रीय विद्यालय, बर्माशेल
बस संख्या ः एक
वारंवारिता ः दोन तास ३० मिनिटे

- मार्ग क्रमांक २२५ ः हिंजवडी माण फेज ३ ते खराडीगाव
मार्गे- विमाननगर कॉर्नर, चंदननगर, रक्षकनगर, आयटी टॉवर, खराडीगाव
बस संख्या ः दोन
वारंवारिता ः दोन तास

---------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.