वीज यंत्रणेपासून खबरदारीसाठी जागृती

वीज यंत्रणेपासून खबरदारीसाठी जागृती

पुणे, ता. ६ : घरगुती किंवा सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीज यंत्रणेपासून योग्य खबरदारी घेण्याची माहिती देत पुणे परिमंडलातील तब्बल १२ हजार नागरिकांशी महावितरणच्या ३७ वीजसुरक्षा दूतांनी थेट संवाद साधला. यासोबतच माहिती पत्रके व समाज माध्यमांद्वारे रिल्स, शॉर्ट फिल्म आणि छायाचित्रांद्वारे वीज सुरक्षेचा जागर करण्यात आला.
महावितरण व विद्युत निरीक्षक विभागाच्या वतीने २६ ते २ जुलैपर्यंत राष्ट्रीय वीजसुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यात महावितरणच्या १८ प्रशिक्षणार्थी उमेदवार तसेच ‘नॉलेज शेअरिंग’ अंतर्गत सामंजस्य करार झालेल्या भारती विद्यापीठ तंत्रनिकेतन, शासकीय तंत्रनिकेतन व वाडिया तंत्रनिकेतनमधील १९ अभियांत्रिकी विद्यार्थी अशा ३७ सुरक्षा दूतांनी कामगिरी बजावली. पुणे व पिंपरी चिंचवड, चाकण, राजगुरुनगर आदी शहरांसह विविध रेल्वे स्थानके, बसथांबा, मंदिरे, उद्याने व इतर गर्दीचे ठिकाणे, घरगुती वसाहती, सोसायट्या आदी ठिकाणी सुमारे १२ हजार नागरिकांना माहिती पत्रकांचे वाटप केले व थेट संवाद साधला. याबरोबर १० शाळा व ३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये खास वर्ग घेत उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पटनी यांनी वीजसुरक्षेबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी कौतुक केले.
महावितरण अंतर्गत या सप्ताहामध्ये १७५ अभियंते, २५० तंत्रज्ञ तसेच ७० यंत्रचालकांना वीजसुरक्षेचा प्रशिक्षण देण्यात आले. मुख्य अभियंता पवार, विद्युत निरीक्षक नितीन सूर्यवंशी यांच्यासह अनेक व्याख्यात्यांनी मार्गदर्शन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com