रेल्वे प्रवासात आगीच्या घटना टाळण्यासाठी मार्गदर्शन

रेल्वे प्रवासात आगीच्या घटना टाळण्यासाठी मार्गदर्शन

पुणे,ता. ६ : रेल्वे प्रवासात ज्वलनशील पदार्थ घेऊन प्रवास करणे दंडनीय अपराध आहे. असे असले तरीही काही प्रवासी छुप्या पद्धतीने प्रवास करतात. त्यामुळे रेल्वेत आग लागण्यासारख्या घटना घडू शकतात. धावत्या रेल्वेत जर आग लागली, तर त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे. कोणत्या उपाययोजना आखणे आवश्यक आहे. काय काळजी घ्यावी आदींबाबत फायर एंड सेफ्टी इन्स्टिट्यूट पुणेचे सेवानिवृत्त संचालक नरेंद्र ठाकूर प्रताप यांनी मार्गदर्शन केले.
ज्वलनशील पदार्थ आणि स्फोटकांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी पुण्याच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता शादाब जमाल यांनी कार्यशाळेचे नियोजन केले होते. यावेळी यांत्रिक विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहायक विभागीय यांत्रिक अभियंता अस्लम जावेद यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com