विद्यार्थी साहाय्यक समितीला मते कुटुंबीयांकडून १० लाख

विद्यार्थी साहाय्यक समितीला मते कुटुंबीयांकडून १० लाख

Published on

पुणे, ता. ८ : विद्यार्थी साहाय्यक समितीतर्फे मुलींसाठी बांधण्यात येत असलेल्या वसतिगृहासाठी खडकवासला येथील मते कुटुंबीयांनी १० लाख रुपयांची देणगी दिली. खडकवासला गावातील ज्येष्ठ कामगार नेते व सामाजिक कार्यकर्ते कै. ज्ञानेश्वर लक्ष्मण मते यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मते कुटुंबीयाने वसतिगृहातील एका खोलीचा खर्च १० लाख रुपये दिला आहे.
मते कुटुंबाने समितीच्या आपटे वसतिगृहात भेट देऊन धनादेश समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी यांच्याकडे दिला. या खोलीला कै ज्ञानेश्वर लक्ष्मणराव मते यांचे नाव देण्यात येणार आहे. या प्रसंगी रत्नाकर मते, पद्माकर मते, सुधाकर मते, कमलाकर मते, शेखर मते, सुमती भिलारे यांच्यासह मते कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. मते कुटुंबीयांनी समितीच्या कार्याची माहिती घेत वसतिगृहाची पाहणी केली. तसेच समितीच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याची इच्छा व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.