मोहमद रफी यांच्या गाण्यांवर मंगळवारी कार्यक्रम

मोहमद रफी यांच्या गाण्यांवर मंगळवारी कार्यक्रम

महंमद रफी यांच्या गाण्यांवर मंगळवारी कार्यक्रम
पुणे, ता. ८ ः महंमद रफी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभरात त्यांच्या १०० गाण्यांचे १०० प्रयोग करण्याचा संकल्प रफी यांना आदर्श मानणारे गायक गफार मोमीन यांनी केला आहे. त्याची सुरुवात मंगळवारी (ता. ११) आयोजित ‘रफी १००’ या कार्यक्रमाने होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी ५ ते ८ या वेळेत हा कार्यक्रम होईल. यात गायिका मनीषा निश्चल आणि समिना शेख सहभागी होणार आहेत. कार्यक्रमासाठी प्रवेशमूल्य विनामूल्य असून, संगीत रसिकांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मोमीन यांनी केले आहे.

‘गोष्टी गावा-शहरांकडील’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे, ता. ८ ः खेड्यातला माणूस मातीचा ओलावा काळजात घेऊन शहरात येतो. गावातील निसर्ग, पोथी पुराणात ऐकलेली प्रासादिक भाषा तुम्हाला समृद्ध करते. नेमके हेच काम साहित्य करते, असे मत ज्येष्ठ पत्रकार मल्हार अरणकल्ले यांनी व्यक्त केले. नारायण कुंभार (एखतपूरकर) लिखित व उषा अनिल प्रकाशनातर्फे प्रकाशिक ‘गोष्टी गावाशहरांकडील’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ कवयित्री व बालसाहित्यकार डॉ. संगीता बर्वे, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, ह. भ. प. अशोक गोरे महाराज, तानाजी एकोंडे, संजय राजे, संदीप तापकीर, लेखक नारायण कुंभार, प्रकाशक अनिल शिंदे उपस्थित होते. प्रतिमा कुंभार यांनी प्रास्ताविक केले. अद्वैता उमराणीकर आणि प्रियंका एखतपूरकर यांनी सूत्रसंचालन केले. चैतन्य एखतपूरकर यांनी आभार मानले.

कर्मयोगाचे भान ठेवावे ः डॉ. मधुसूदन घाणेकर
पुणे, ता. ८ ः आत्मनिर्भर होत असताना प्रत्येकाने महत्त्वाकांक्षेसह कर्मयोगाचे भानही ठेवावे, असे मत भाजपच्या सांस्कृतिक विभागाच्या ज्येष्ठ नागरिक आघाडीचे शहराध्यक्ष डॉ. मधुसूदन घाणेकर यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिक आघाडीतर्फे ‘भारत आत्मनिर्भर होण्यासाठी मी काय योगदान देऊ शकेन’ या विषयावर आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी भाजप महिला आघाडीच्या शहर कार्याध्यक्षा भारती महाडिक, ज्येष्ठ नागरिक आघाडीचे शहराध्यक्ष मदन डांगी, कार्याध्यक्ष श्रीनिवास तेलेग, संघटक श्रीकांत कुलकर्णी उपस्थित होते. निबंध स्पर्धेतील बावीस विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. रवी सरनाईक यांनी संयोजन केले. स्वाती दिवाण यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com