पुण्याचा कुपोषणमुक्तीचा फॉर्म्युला राज्याला उपयुक्त

पुण्याचा कुपोषणमुक्तीचा फॉर्म्युला राज्याला उपयुक्त

पुणे, ता. ८ ः पुणे जिल्हा परिषदेने अमलात आणलेले ‘एमएसडी’ हे सूत्र बालकांच्या कुपोषणमुक्तीसाठी फायदेशीर ठरू लागले असल्याचे मत राज्याच्या एकात्मिक बालविकास योजनेच्या (आयसीडीएस) आयुक्त डॉ. रुबल अग्रवाल यांनी शनिवारी (ता. ८) येथे बोलताना व्यक्त केले.
आयुक्त डॉ. अग्रवाल यांनी शनिवारी पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांना भेटी देऊन, अंगणवाडी सेविकांशी संवाद साधला. या वेळी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे उपस्थित होते. या सूत्रामुळे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण लक्षणीय कमी झाले आहे. जिल्ह्यात सध्या गंभीर तीव्र कुपोषणाची (सॅम) केवळ ९५ बालके आणि मध्यम तीव्र कुपोषणाची (मॅम) ४०२ बालके उरली आहेत. बालकांचे कुपोषण कमी होण्याच्या यशाचे श्रेय हे केवळ सूक्ष्म तपासणी प्रक्रिया, सुनियोजित हस्तक्षेप आणि एकात्मिक बाल विकास विभागाने आरोग्य विभागाच्या सहकार्याने केलेल्या अथक प्रयत्नांना जाते, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या पोषण आहार ट्रॅकर प्रणालीद्वारे डेटा संकलन, विश्लेषण आणि अहवालाची कार्यक्षमता वाढविता येते. शिवाय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्णय प्रक्रिया सक्षम करता येते. त्यामुळे या प्रणालीमुळे रिअल-टाइम डेटा लक्षित हस्तक्षेप, इष्टतम संसाधन वाटप आणि मुलांच्या पोषण स्थितीचे सतत निरीक्षण करणे सोपे होते. त्यामुळे अंगणवाडीसेविकांनी डिजिटल साधन वाढीचे नमुने, आहारातील सेवन, लसीकरण स्थिती आणि आरोग्य नोंदी यासारख्या आवश्यक निर्देशकांचा मागोवा घेतला पाहिजे. अचूक आणि अद्ययावत माहितीसाठी ही मिळण्यासाठी या प्रणालीची वापर केला पाहिजे, असे डॉ. अग्रवाल यांनी या वेळी अंगणवाडीसेविकांना सांगितले. या वेळी डॉ. अग्रवाल यांनी अंगणवाडीसेविकांनी बाजरीचा वापर करून तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांच्या प्रदर्शनालाही भेट दिली. पुणे जिल्हा परिषदेने आंगणवाडीतील माध्यान्ह भोजनात बाजरीचा समावेश केला आहे.

‘एमएसडी’ सूत्र म्हणजे काय?
पुणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील बालकांच्या कुपोषणमुक्तीसाठी सुरू केलेले एमएसडी सूत्र म्हणजे वैद्यकीय (Medical), शल्यक्रिया(Surgical) आणि आहारविषयक (Dietary) या त्रिसूत्रीचा अवलंब होय. या त्रिसूत्रीतील इंग्रजी शब्दांच्या लघुरुपातून ‘एमएसडी’ हे सूत्र निर्माण झाले आहे. यानुसार मेडिकल या शब्दातील पहिले आद्याक्षर म्हणजे एम, सर्जिकल या शब्दातील पहिले आद्याक्षर ‘एस’ आणि ‘डायट्री’ या शब्दांतील पहिले आद्याक्षर ‘डी’ असे आहे. या तिन्ही शब्दांतील पहिले आद्याक्षरांच्या माध्यमातून तयार झालेले लघुरुपाला एमएसडी असे म्हटले जाते.

PNE23T54119

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com