अध्ययन ऱ्हास टाळण्यासाठी ‘सेतू’

अध्ययन ऱ्हास टाळण्यासाठी ‘सेतू’

Published on

पुणे, ता. १० : विद्यार्थ्यांचा झालेला अध्ययन ऱ्हास भरून काढणे आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सेतू अभ्यासक्रम’ राबविण्यात येत आहे.

अभ्यासक्रमाचे स्वरूप
- २० दिवसांचा अभ्यास
- मराठी आणि उर्दू माध्यम
- ४६ लाख ५६,४३३ विद्यार्थ्यांसाठी
- अभ्यासक्रम छापील स्वरूपात
- दिवसनिहाय कृतीपत्रिका

का भासली गरज?
राज्यात ‘राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१’ नुसार भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र विषयातील विद्यार्थ्यांची संपादणूक कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्वांचा शालेय गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांमध्ये इयत्तानिहाय आणि विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्याचेही निदर्शनास आले.
त्यामुळे विद्यार्थ्यांचा झालेला अध्ययन ऱ्हास भरून काढणे आणि शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणे, हे साध्य करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने ‘सेतू अभ्यासक्रम’ हाती घेतला आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या मार्गदर्शक सूचनेनुसार सार्थक पुस्तिकेतील राज्याने पूर्ण करावयाच्या कार्यांपैकी विद्यार्थ्यांना सेतू अभ्यास उपलब्ध करून देणे, हे एक महत्त्वपूर्ण कार्य आहे. शालेय शिक्षण विभागातर्फे हे कार्य पूर्ण करण्यात येत आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून यासंबंधित माहिती देण्यात आली.

असा असेल सेतू अभ्यास
इयत्ता - विषय
दुसरी ते पाचवी - प्रथम भाषा, गणित, इंग्रजी
सहावी ते दहावी - प्रथम भाषा, गणित, इंग्रजी, सामान्य विज्ञान, सामाजिक शास्त्र

राज्यात ‘सेतू’ अंमलबजावणी
४ जुलै ते २६ जुलै

सेतू परिणामकारक असल्याचे निष्कर्ष
(सर्व विषयांच्या चाचणीत विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांत वाढ)
इयत्ता : वाढलेली टक्केवारी
- दुसरी ते पाचवी : ८.१५
- पाचवी ते आठवी : ५.४७
- नववी ते दहावी : ३.१५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.