जिल्ह्यात पावसाची २७ टक्के तूट

जिल्ह्यात पावसाची २७ टक्के तूट

पुणे, ता. १० ः जिल्ह्यात उशिरा दाखल झालेल्या मॉन्सूनने पहिल्या दिवसापासूनच बरसण्यास सुरुवात केली. जूनच्या शेवटच्या आठवड्यात घाटमाथ्यासह अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मात्र, अजूनही जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत २७ टक्के कमी पाऊस पडला असून, ७५ मिलिमीटर पावसाची तूट कायम आहे.

अरबी समुद्रात गुजरात ते केरळ किनारपट्टी लगत तयार झालेला कमी दाबाचा पट्टा. तसेच दक्षिणेत असलेला मॉन्सूनचा आस यामुळे देशभरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, अजूनही पुणे जिल्ह्याला जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. मागील काही दिवसांपासून पावसाची रिमझीम कमी झाली असून, उघडीपही वाढली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात २८४ मिलिमीटर पावसाची नोंद होणे आवश्यक होते. मात्र, आजवर २०९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. जिल्ह्यात पुढील दोन दिवस आकाश मुख्यतः ढगाळ, तर हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याच काळात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com