‘लोकमान्य सोसायटी’तर्फे  ‘लोक मॉन्सून’ ठेव योजना सादर

‘लोकमान्य सोसायटी’तर्फे ‘लोक मॉन्सून’ ठेव योजना सादर

Published on

पुणे, ता. ११ ः ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड’तर्फे ‘लोक मॉन्सून’ ही मुदतठेव योजना सादर करण्यात आली आहे. कमी कालावधीची आकर्षक परतावा देणाऱ्या या योजनेस ठेवीदार, खातेदार, सभासदांचा लक्षणीय प्रतिसाद मिळतो आहे.

पाचशे दिवसांसाठी असलेल्या या गुंतवणूक योजनेसाठी ९.५० टक्के व्याजदर असून ज्येष्ठ नागरिकांसाठी .५० टक्के इतका अधिकचा व्याजदर आहे. ठेवीदार, खातेदार, सभासदांना या योजनेत १० हजार रुपयांची किमान गुंतवणूक करता येणार आहे. आजच्या आर्थिक परिस्थितीत सोप्या गुंतवणुक प्रक्रियेसह मर्यादित कालावधीसाठी हमखास व चांगला परतावा मिळवून देणारी ही योजना आहे.
गुंतवणूकदार घरबसल्या ‘डिजिटल प्लॅटफॉम’च्या माध्यमातून देखील (www.lokmanyaonline.com) या योजनेमध्ये पैसे गुंतवू शकतात. लोकमान्य सोसायटीच्या कोणत्याही शाखेत किंवा १८००-२१२-४०५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून ठेवीदार, खातेदार, सभासद, गुंतवणूकदारांना या योजनेचा लाभ घेता येईल, अशी माहिती लोकमान्य सोसायटीतर्फे देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.