महिलेच्या घरातून चोरलेला १२ लाखांचा ऐवज जप्त

महिलेच्या घरातून चोरलेला १२ लाखांचा ऐवज जप्त

Published on

पुणे, ता. ११ : कात्रजजवळील मांगडेवाडी परिसरातील एका महिलेच्या घरातून चोरीस गेलेल्यापैकी सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे १२ लाखांचा ऐवज भारती विद्यापीठ पोलिसांनी जप्त केला आहे. या घरफोडीत साडेसात लाखांची रोकड आणि १० तोळे सोन्याचे दागिने असा १३ लाखांचा ऐवज चोरीस गेला होता.
याबाबत एका महिलेने फिर्याद दिली. त्यावरून शुभम अशोक माने (वय २३, रा. मांगडेवाडी, कात्रज) याला अटक केली होती. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून पाच लाख ३७ हजारांची रोकड, १० तोळे सोन्याचे दागिने यासह १२ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.